Skip to content Skip to footer

आम्ही कुठे अजित पवारांना भाजपात घेतलंय – चंद्रकांत पाटील

भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांना भाजपात प्रवेश नाही, असं म्हणत आम्ही आणखी कुठं अजित पवारांना भाजपात घेतलंय? असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्यांच्यावर भ्रष्टाराचे आरोप आहेत किंवा ज्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे अशा कुठल्याच व्यक्तीला आम्ही भाजपात प्रवेश दिला नाही. राधाकृष्ण विखेंवर कोणताही भ्रष्टाचाराचा डाग नाही आणि कुठलाच गुन्हा नाही, असं पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातून काँग्रेस संपवणे हाच माझा उद्देश आहे – चंद्रकांत पाटील

आम्ही आणखी राष्ट्रवादीच्या अजित पवार, छगन भुजबळ यांना पक्षात प्रवेश दिला नाही. गंभीर गुन्हा असणारे एकही नेते भाजपात नाहीत आणि इथून पुढच्या काळात देखील भाजपात अशा प्रकारच्या कोणत्याही नेत्याला भाजपमध्ये जागा नाही, असं पाटील म्हणाले.

भाजपमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर कधीच अन्याय होणार नाही. कार्यकर्त्याकडे पाहण्यासाठी 10 हजार डोळे आणि 20 हजार कान आहेत, असा विश्वास त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना यावेळी दिला.

Leave a comment

0.0/5