Skip to content Skip to footer

मी राजकारणात स्वतःच्या हिमतीवर आलोय, माझे चुलते मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्री नव्हते – अढळराव पाटील

गेली १५ वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार अढळराव पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला होता. मात्र आता लोकसभा निवडणुकीचे वारे शांत झाल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक वादळ सुरु झाले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवार, अजित पवार कोणीही येऊ द्या, असे आव्हान शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभा निवडणुकीत देत होते. एवढी आणि अशी मस्ती त्यांना होती. तरी त्यांचा पराभव झाला. मस्ती जिरली. कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे, अस विधान केले आहे.

अजित पवारांच्या त्या विधानाला उत्तर देताना अढळराव पाटील म्हणाले की, मला अजित पवार नावाच्या वाचाळवीराला सांगायचं आहे. महाराष्ट्र मधील शेंबड पोरगं देखील सांगेल कोणाचा चेहरा काळवंडलाय आणि कोणाची मस्ती जिरली आहे, स्वतःच्या मुलाला निवडून आणता येत नाही अशा माणसान माझ्यावर बोलन हा एकप्रकारचा विनोदच आहे असा टोमणा पाटील यांनी अजित पवारांना लगावला होता.

Leave a comment

0.0/5