शिवसेनेच्या दणक्याने कृषी विभागाला आली जाग, पहिला हप्ता विमा कंपन्यांना सुपूर्त…..

कृषी । http://www.easyhindityping.com/marathi-to-english-translation

शिवसेनेने वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे विमा कंपन्यांच्या विरोधात काढलेल्या मोर्चानंतर कृषी विभागाला जाग आलेली आहे. भारती ऍक्सा कंपनीवर मोर्चा काढून १५ दिवसांत शेतकऱयांच्या नुकसानभरपाईचे पैसे जमा करणाऱयाचा इशारा दिला. या इशाऱयानंतर विमा कंपन्यांबरोबरच सरकारच्या कृषी विभागालाही जाग आली असून तब्बल ३१५ कोटींचा पीक विम्याचा हप्ता भारती ऍक्सा, फ्युचर, बजाज अलायन्झ या कंपन्यांकडे जमा करण्यात आला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात प्रचंड मोर्चा काढला. या मोर्चात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांच्या पिकांच्या नुकसानभरपाईचे विम्याचे पैसे १५ दिवसांच्या आत जमा करा, अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देऊ असा इशारा दिला. याचे पडसाद उमटले असून दोनच दिवसांत सरकारकडूनही तत्काळ विमा कंपन्यांचा हप्ता जमा करण्यात आला आहे.

आज या विमा कंपन्यांच्या मनमानी कारभार विरोधात काढलेल्या मोर्चामुळे शेतकऱयांना पीकविमाचे पैसे लवकरच भेटणार आहे. त्यामुळे या मोर्चाला पौब्लिसिटी स्टन्ड म्हणणाऱ्या विरोधाच्या गालावर शिवसेनेने लागवलेली एक चपकारच आहे. रब्बी हंगामाकरिता २७१ कोटी ५४ लाख रुपयांचा हप्ता कृषी विभागाकडून विमा कंपन्यांकडे जमा करण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here