Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याला विधानसभेच्या निवडणुकीला वंचितच वाटतोय योग्य पर्याय

लोकसभा निवडणुकीला काँग्रेस-राष्ट्र्वादीने सपाटून मार खाल्यानंतर आता या पक्षाच्या नेत्यांना आपल्या राजकीय भवितव्यासाठी इतर पक्षाचा सहारा घेण्याची इच्छा प्रकट होत आहे, त्यातच आता सातारा शहरातील एका बड्या नेत्याने वंचित मध्ये जाण्याचे संकेत दिल्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पडणार असेच दिसून येते. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे देखील नाव पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या चर्चेमध्ये आहे. शिवसेना शहर अध्यक्ष सचिन जवळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आता सर्वांच्या मतानुसार माझे सर्व पक्ष झाले आहेत. फक्त आता वंचित आघाडी एवढाच पर्याय उरलाय. मग काय करायच तोच पर्याय योग्य वाटतोय, असे म्हणत शिवेंद्रराजे यांनी उपस्थितांच्या चर्चांना आळा घातला. दरम्यान शिवेंद्रराजे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती.

कारण लोकसभा निवडणुकीवेळी सातारचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांनी या भेटीचा निष्कर्ष पक्षांतर असा काढला. मात्र तसे काही झाले नाही. तसेच शिवेंद्रराजे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर त्यांनी लोकसभेतून माघार घेतली.

Leave a comment

0.0/5