Skip to content Skip to footer

युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा ठाण्यात पोहचणार…..

जनतेची मनं जिकतं, आशीर्वाद घेत शिवसेना नेते युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा सोमवारी सायंकाळी ६ वाजता ठाण्यात पोहोचणार आहे. जनआशीर्वाद घेतानाच आदित्य ठाकरे ठाण्यातील पालिका मुख्यालयात जनतेशी संवाद साधणार आहेत. मागील चार दिवसा पासून आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद दौऱ्याच्या माध्यमातून जळगाव जिह्यातील विविध ठिकाणी सभा घेऊन जनतेशी, युवकांशी आणि विध्यर्थ्यांशी मुक्त संवाद साधला.

 

जे शेतकरी बांधव मला आशीर्वाद देतात तो माझा खरा देव आहे – आदित्य ठाकरे

गेली पाच वर्ष आपण सत्तेत असो किंवा नसो जनतेसाठी आपण निवेदने आंदोलने केली. हे करत असताना जनता आमच्या सोबत राहिली म्हणून या जनतेचे आभार मानण्यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा आहे. लोकसभेत आपले खासदार, आपले वाघ दिल्लीत गेले त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मतदान केलं, ज्या लोकांनी प्रचार केला त्यांचे आभार मानण्यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा आहे. हा देश तर भगवा झालेलाच आहे पण आपल्याला महाराष्ट्र भगवामय करायचा आहे. असे उदगार त्यांनी या यात्रेदरम्यान बोलून दाखविले होते

15 Comments

Leave a comment

0.0/5