Skip to content Skip to footer

लबाड कोल्हा पुन्हा कुई- कुई करू लागला….

मला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी साताऱ्याचे महाराज छत्रपती उदयराजे भोसले विरोधात निवडणुकीला उभे राहण्यासाठी सांगितले व मी त्या गदिशी गद्दरी करू शकत नाही म्हणून मी शिवसेना सोडली असे धडधडीत खोटं बोलणाऱ्या कोल्हे यांनी राजेंवर राष्ट्रवादी नेते अत्यंत खालच्या पातळीची टीका करत असताना का बरं अध्यक्ष शरद पवारांना जाब विचारला नाही किवा राष्ट्रवादी सोडली नाही म्हणजे अमोल कोल्हे फक्त मतांच्या राजकारणासाठी आपण तमाम शिवभक्तांची दिशाभुल करत आहे. आता पुन्हा एकदा प्रकाश झोतात राहण्यासाठी आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न कोल्हे यांनी केलेला आहे.

इतरांची कामे आपल्या नावावर खपवणाऱ्या कोल्हे यांना इतरांना नावे ठेवण्याचा नैतिक अधिकार राहतो का? आज बैलगाडा शर्यतीसाठी पाठ पुरवठा करणाऱ्या माजी खा. आढळराव पाटील यांच्या कामाचे श्रेय चोरण्याचा प्रयत्न कोल्हे यांनी केला आहे.
“घड्याळयात वाजले बारा, राष्ट्रवादीचे सुद्धा वाजले बारा” असे शिवसेनेत असताना म्हणणाऱ्या कोल्हेंनी कसे काय बंद घड्याळ हातात बांधले असेल. यावरून अमोल कोल्हे फक्त राजकारण करत आहे हेच दिसून येते. आज इतकी वर्ष राष्ट्रवादीची सत्ता असून सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यास राष्ट्रवादी अपयशी ठरली म्हणूनच जनतेनं त्यांना २०१४ ला घरचा रस्ता दाखविला.

सध्या आपण सुद्धा त्याच पक्षाचे खासदार आहात. परंतु इतरांचे काम आपल्या नावावर खपवण्याचा केविलवाणा प्रकार आता जनतेच्या लक्षात येत आहे. आज आदित्य ठाकरे “जन आशिर्वाद” दौऱ्याच्या माध्यमातून जनतेशी साधत असलेला संवाद आपल्या राष्ट्रवादी पक्षाला कुठेतरी खटकत आहे. म्हणूनच आपण आणि आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बिनबुडाचे आरोप लावणे चालू केले आहे.

Leave a comment

0.0/5