Skip to content Skip to footer

मोहिते आणि बांदल पहिल्यापासूनच गुंड प्रवृत्तीचे – शिवाजीराव अढळंराव पाटील

शिवसेनेचे नेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते व प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे दोघेही पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. शिरूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना ‘चो-या करायच्या तुम्ही, लोकांना फसवायचं, लुटायचं, खंडणी गोळा करायची तुम्ही, दंगल घडवायची तुम्ही, आणि ही प्रकरणे अंगाशी यायला लागली की या प्रकरणाच्या मागे आढळरावांचा हात आहे असा कंगावा करायचा अशा शब्दात मोहिते आणि बांदल यांच्यावर टीका केली.

तसेच दिलीप मोहिते व मंगलदास बांदल या दोघांचाही मागील पंचवीस वर्षाचा इतिहास पाहिला तर या दोघांनी अनेकांचे संसार उद्धवस्त केले आणि स्वत: केलेले पाप माझ्या अंगावर टाकतात. माझी पंधरा वर्षातील कारकिर्द पहा आणि या दोघांची कारकीर्द पहा असंही आढळराव म्हणाले.

Leave a comment

0.0/5