Skip to content Skip to footer

पुण्याच्या इंजिनिअरने केला काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अर्ज…

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसकडून नव्या अध्यक्षांचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. अशातच आता पुण्यातील एका इंजिनिअर तरुणाने काँग्रेसचा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा तरुण यासाठी काँग्रेसकडे याबाबत लवकरच पत्रही पाठवणार आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या पुण्यातील तरुणाचे गजानन होसाळे असं नाव असून तो पेशाने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहे. ‘काँग्रेस टिकणं ही देशाची गरज आहे आणि त्यासाठी काँग्रेसला तरुण नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच मी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करत आहे,’ असं गजानन होसाळे याने म्हटलं आहे. पुण्यातील या तरुणाला आता काँग्रेसकडून कसा प्रतिसाद देण्यात येतो, हे पाहणं उस्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a comment

0.0/5