Skip to content Skip to footer

राज्यात पुन्हा भगवाच फडकणार – आदित्य ठाकरे

दुष्काळमुक्त, बेरोजगारीमुक्त, प्रदूषणमुक्त असा नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी खंबीर साथ द्या, आशीर्वाद द्या, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर येथे त्यांच्या दणदणीत सभांना प्रचंड गर्दी उसळली होती. आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले.
आगामी निवडणुकीत राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
जळगावच्या पाचोरा येथून सुरू झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा नाशिकमध्ये शनिवारी तिसरा दिवस होता.

आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन आदित्य ठाकरे यांनी दर्शन घेतले, अभिषेक केला. यानंतर त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेतकऱयांशी संवाद साधला. शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारच्या काळात शिवसेनेचे मंत्री आरोग्य, पाणी यासह विविध योजना, प्रकल्प तातडीने मार्गी लावत आहेत. अनेक प्रश्नांवर आलेल्या निवेदनावर तातडीने दखल घेतली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात खुटवडनगरच्या सिद्धीविनायक हॉल येथे त्यांनी नागरिकांशी आणि देवळाली मतदारसंघात सिन्नर फाटा येथे त्यांनी शेतकऱयांशी संवाद साधला.

शिवसैनिक हा निवडणुकीतच नव्हे तर सतत जनसेवेसाठी कार्यरत असतो. ऐंशी टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसारच शिवसेनेचे कार्य सुरू आहे, यापुढेही ते असेच सुरू राहील.

Leave a comment

0.0/5