Skip to content Skip to footer

काँग्रेसच्या संकटात अजून वाढ, आमदार जयकुमार गोरेंनी दिल्या मुख्यामंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होणं हे तसे काही नवीन नाही. महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती उदार असल्याने सर्वच पक्षांचे नेते एकमेकांना शुभेच्छा आणि सदिच्छा देत असतात. पण राज्यातले राजकीय वातावरण आणि आगामी विधानसभा निवडणुका यामुळे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षांचे कोण नेते जातात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यात लक्ष वेधून घेतलं ते काँग्रेसचे आमदार आणि प्रतोद जयकुमार गोरे यांनी. त्यांनी ‘सह्याद्री’ अतिथिगृहात जाऊन मुख्यमंत्र्यांना खास शुभेच्छा दिल्या आणि राजकीय चर्चेला सुरुवात झाली.

माण खटावचे आमदार असलेले गोरे हे भाजपात जातील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यात गोरे यांनी आज मुख्यमंत्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्र्यांनी रविवारी भाजप कार्यकारिणीत बोलताना जे भाजपमध्ये येतील त्यांचं स्वागत करू असे सुद्धा म्हणून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5