Skip to content Skip to footer

जयंत पाटील साहेब तुमचं लादलेले प्रॉडक्ट नको त्या ठिकाणी झाडू मारतय…

सध्या राष्ट्रवादीचे सर्वच नेते अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर चमकण्यासाठी सेना-भाजपा नेत्यांना कुठेतरी टार्गेट करून टीका करत आहे. असाच काहीसा केविलवाणा प्रकार राष्ट्र्वादीचे नेते जयंत पाटील यांनी केलेला आहे. जिथे त्यांना आपल्या होम ग्राऊन्ड्वर म्हणजे इस्लामपूर मतदार संघात लोकसभा निवडणुकीला चंगली कामगिरी करता आलेली नाही तिथे आज युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करून प्रसिद्धीत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वादच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम नागिरकांशी आणि शेतकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी या दौऱयाचे आयोजन केले आहे. परंतु आपली बालिश बुद्धी लावून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांनी हा दौरा निवडणूक तज्ज्ञ प्रशांत किशोर यांचे प्रॉडक्ट असल्याची खोचक टीका जनआशीर्वाद यात्रेवरून केली आहे. आज आदित्य ठाकरे यांच्या दौर्याला मिळत असलेला तरुणांनाचा प्रचंड प्रतिसाद कुठेतरी राष्ट्रवादीच्या मनात धडकी भरून देत आहे.

 

अजित पवारांच्या बैठकीला नगरसेवकांची दांडी

एकीकडे आदित्य ठाकरे हे जनतेशी संवाद साधत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार स्टंटबाजी करत कचरा नसलेल्या ठिकाणी स्वछता मोहीम अंतर्गत झाडू मारताना दिसत आहे. जिथे आपल्या युवा नेत्याला कुठे झाडू मारावा इतके सुद्धा समजत नसेल तर आपल्या पक्षाने इतरांना नावे ठेवण्यापेक्षा आपल्या युवा नेत्याला राजकारणाचे धडे देणे आपल्या पक्षासाठी भविष्यामध्ये अधिक उपयोगी ठरेल.

Leave a comment

0.0/5