Skip to content Skip to footer

सरसकट कर्जमुक्ती मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही -आदित्य ठाकरे

राज्यातील शेतकऱयांना विसरून चालणार नाही. कर्ज मुक्ती झालीच पाहिजे. माफी गुन्हेगारांना दिली जाते, शेतकऱ्यांना नाही. शेतकरी हा गुन्हेगार नाही. आज कर्जमुक्ती होत असली तरी भरपूर ठिकाणी गोंधळ आहे. काहींना कर्जमुक्तीची प्रमाणपत्र मिळाले परंतु प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. तसे झाले असेल तर शिवसैनिकांना सांगा. ते तुम्हला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे.

जन आशीर्वाद यात्रे निमित्त आझाद मैदानासमोरील मुख्य रस्त्यावर आयोजित विजय संकल्प मेळाव्याला ते बोलत होते. यावेळी त्यांच्या बरोबर पर्यावरण मंत्री रामदास कदम, माजी जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे, खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते

.पुढे आदित्य ठाकरे महाले की, सरसकट कर्जमाफी भेटू पर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही आहे. शिवसेना शेतकर्यांन बरोबर आहे. तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढणार, शिवसेना आणि शेतकरी हे वेगळे नाही आहे असे सुद्धा आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5