Skip to content Skip to footer

वाढदिवसाला पुष्पगुच्छ आणि होर्डिंग्ज नको, पैसे सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करा – उद्धव ठाकरे

२७ ला जुलै शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त शिवसैनिक त्यांना प्रत्यक्ष भेटून व रस्त्यावर होर्डिंग्ज लावून शुभेच्छा देतात. परंतु यावेळी अस काही करू नका अस आवाहन उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व शिवसेनिकांना आणि चाहत्यांना केले आहे. एकीकडे इतर राजकीय पक्षातील नेते मंडळी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण शहरात बॅनर लावून शहर भकास करायचे काम करतात दिसत असतात. तर दुसरीकडे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्या सल्ला देताना दिसतात.

याविषयी उद्धव ठाकरे यांनी माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे लावू होर्डिंग्ज नकोत, पर्यावरणाला हानी पोहोचेल असे काही करू नका, अस आवाहन शिवसैनिकांना केले आहे. तसेच पुष्पगुच्छ आणि होर्डिंग्जचे पैसे सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करा, असेही ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मते पैसे व्यर्थ खर्च करण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करा. हे पैसे सामाजिक उपक्रमासाठी वापरल्याने सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल. तसेच योग्य ती मदत गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल अस ठाकरे यांचे मत आहे.

Leave a comment

0.0/5