Skip to content Skip to footer

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ठाणे मनपा मुख्यलयात ट्विटर पेजचे अनावरण

पूर्वी एखादी समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी पत्रव्यवहार केला जात होता. त्यामध्ये बराच कालावधी निघून जात होता. आता मात्र सोशल मीडियामुळे तक्रारींचे निरसण करणे सोपे झाले असून ठाणे महापालिकेच्या टिष्ट्वटर अकाउंटच्या या ई-चिठ्ठीमुळे सर्वांच्याच समस्या तत्काळ सुटू शकणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.मंगळवारी ते ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापालिकेच्या ट्विटर पेजचा शुभारंभ करण्यासाठी आले होते.

यावेळी त्यांच्या समवेत अध्यक्षस्थानी महापौर मीनाक्षी शिंदे याउपस्थित होत्या. मुंबई महापालिकेतही अशा पद्धतीने पेज तयार केले असून महिनाभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वी एखाद्या ठिकाणची समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी नगरसेवकापासून ते महापालिकेपर्यंत विविध विभागात नागरिकांना जावे लागत होते.

मात्र, आता या पेजमुळे तुम्ही तुमच्या प्रभागातील तक्रारी, समस्या टाकू शकता आणि त्याची सोडवणूक सुद्धा नगरसेवक किंवा पालिका प्रशासनाच्या माध्यमातून तत्काळ होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a comment

0.0/5