Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीच्या गलिच्छ राजकारणामुळे भाऊंनी केला पक्षाला राम-राम

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिथे इतर पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. तिथे राष्ट्रवादी पक्षातुन जयदत्त क्षीरसागर यांच्या नंतर पुन्हा एकदा मुंबई शहरातील एका बड्या नेत्याने राष्ट्रवादीच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. वरळी-कोळीवाडा विभागातील माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिनभाऊ अहिरे यांनी राष्ट्रवादीचे बंद घडयाळ काढून हातात शिवसेनेचे शिवबंधन बांधणार आहे. त्यामुळे मुंबईतून लवकरचं राष्ट्रवादी हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे असेच चित्र दिसून येते.

पंरतु सचिनभाऊ अहिरे यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे कारण मुख्यतो शिरूर मतदार संघात निवडून आलेले खा. अमोल कोल्हे हेच आहे असेच बोलले जाते. काही दिवसापूर्वी अजित पवारांनी मुंबईतील विधानसभेची जबाबदारी ही खा. अमोल कोल्हे यांच्यावर सोपवलेली होती. परंतु कोल्हे यांच्यावर पुणे किंवा शिरूरची मतदार संघाची जबाबदारी सोपवण्याचे सोडून सचिनभाऊ अहिरे यांना डावलून कोल्हे यांना महत्व देण्याचे काम पवार कुटुंबांनी केलेले आहे.

खरं पहिले तर कोल्हे यांना राष्ट्र्वादी पक्षात येऊन फक्त ५ महिने झालेले आहे. परंतु कोल्हेवर शरद पवार आणि अजित पवार यांनी जास्त विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे पक्षातील वरिष्ठ आणि जुन्या नेत्यांवर नकळत पवार परिवार अन्याय करताना दिसत आहे. आज एका उपऱ्यासाठी राष्ट्रवादीने सचिनभाऊ अहिरे यांच्या सारख्या ताऱ्याला गमविले आहे आणि याची किंमत येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादीला चुकवावी लागणार आहे.

Leave a comment

0.0/5