Skip to content Skip to footer

जितेंद्र आव्हाडांची भविष्यवाणी ठरली खोटी…….

सचिन आहिर यांच्या पक्षांतराच्या वृताबाबत जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसापूर्वी भाष्य केले होते. ज्यांना पक्षानी खास करून शरद पवार साहेबानी पुत्रव्रत प्रेम दिले ते कधीच गद्दारी करणार नाहीत. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून आपले मत मांडलेले होते. सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत केवळ अफवा आहे. त्यामुळे यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन आव्हाड यांनी केले होते. मात्र सचिन अहिर यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आव्हाड यांना तोंडघशी पाडले आहे.

आज सचिन अहिरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वर्तविलेली भविष्यवाणी खाती ठरलेली आहे. दरम्यान सचिन अहिर यांनी शिवसेना प्रवेशा दरम्यान, ‘आम्हाला पक्ष फोडायचा नाहीये, तर शिवसेना वाढवायची आहे’ असे अहिर म्हणाले. तसेच दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारा मी कार्यकर्ता आहे, शिवसेना वाढवण्याचे काम मी करेन असं देखील सचिन अहिर म्हणाले.

Leave a comment

0.0/5