Skip to content Skip to footer

‘फक्त १५ मिनिट पोलीस हटवा…’ अकबरुद्दीन ओवैसी पुन्हा बरळला……

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. २०१३ मध्ये दिलेल्या ‘ फक्त १५ मिनिट पोलीस हटवा आणि मुसलमानांची ताकद बघा’ या धमकीचा पुनरुच्चार एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे छोटे बंधू अकबरुद्दीन यांनी केला आहे. तेलंगणा मधील करीमनगर येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी या धमकीचा पुनरुच्चार केला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकत्याच एका गंभीर आजारातून उठलेल्या अकबरुद्दीन यांनी करीमनगर मध्ये एक सभा घेतली. या सभेत मॉब लिचिंगच्या घटनांचा उल्लेख करताना अकबरुद्दीन म्हणाले, माझा १५ मिनिट वाल्या वक्तव्याची दहशत अजूनही काही लोकांमध्ये कायम आहे. तसेच आरएसएस, बजरंग दल आणि भाजपच्या लोकांना घाबरण्याची आवश्यकता नसल्याचेही अकबरुद्दीन उपस्थित लोकांना म्हणाले.

Leave a comment

0.0/5