Skip to content Skip to footer

राष्ट्रवादी फोडणार नाही पण शिवसेना वाढवणार-सचिनभाऊ अहिरे

राष्ट्रवादीचे माजी गृहराज्य मंत्री तथा मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष सचिनभाऊ अहिरे यांनी आज सकाळी मातोश्री येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे हे आता आमचे स्वप्न आहे असे सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सचिन अहिर यांचे उद्धव ठाकरेंनी स्वागत केले. राजकारण हे राजकारणासारखं करावं लागतं. पक्ष फोडणं ही शिवसेनेची वृत्ती नाही, आम्ही आमच्या कामाने शिवसेना वाढवली आहे. मला फोडलेली माणसं नकोत, मनं जिंकलेली माणसं हवी आहेत.

हाती भगवा झेंडा घेऊन सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते त्यांच्या पत्नीसह मातोश्रीवर आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरु होती. त्यांनी मला त्यांचं नवमहाराष्ट्राचं स्वप्न सांगितलं. मलाही ते महत्त्वाचं वाटू लागलं.

महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं अहिर यांनी म्हटलं आहे. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असेही अहिर यांनी म्हटलं आहे. तर सचिन अहिर शिवसेनेत आल्याचा आनंदच आहे. आम्हाला मनं जिंकायची आहेत फोडाफोडीचं राजकारण करायचं नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Leave a comment

0.0/5