Skip to content Skip to footer

मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची शेवटची फांदी सुद्धा तुटली……..

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मुंबईत मोठे खिंडार पडले आहे. माजी गृहराज्य मंत्री तथा राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष सचिनभाऊ अहिरे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देऊन शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. या निर्णया बद्दल अहिरे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना वरळी येथील कार्यलयात बोलावून त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अहिरे यांनी राष्ट्रवादीला मुंबईत जोरदार धक्काच दिलेला आहे.

सध्या मुंबईत राष्ट्रवादी पक्षाची ताकत पहिली तर न असल्यासारखीच आहे. त्यातच आता अहिरे यांनी पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादीची संपूर्ण ताकदच मुंबईत संपुष्ठात आलेली दिसून येत आहे. राष्ट्रवादीने पाहिल्या पासूनच आपले संपूर्ण लक्ष पश्चिम महाराष्ट्रात केंद्रित केले होते. कारण आज पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या दूध संघावर आणि साखर कारखाण्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची मत्तेदारी आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही की पक्षाच्या नेत्यांनी पक्ष वाढवण्यापेक्षा आपली मालमता वाढवण्यावर भर दिला आहे.

राष्ट्रवादीच्या गलिच्छ राजकारणामुळे भाऊंनी केला पक्षाला राम-राम

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी पक्षाला एक किंवा दोन जागा महाआघाडीकडून भेटू शकत होत्या. या दोन जागेमध्ये सचिन भाऊ अहिरे यांच्या जागेचा सुद्धा समावेश होता. अहिरे यांनीच राष्ट्रवादी मुंबईत टिकवली होती. परंतु आता त्यांच्या जाण्याने शेवटची फांदी सुद्धा मुंबईतील राष्ट्रवादीची तुटलेली आहे.

Leave a comment

0.0/5