Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी एका संस्थापकांचा मुलगा भाजपाच्या वाटेवर

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाला राम-राम ठोकून सेना-भाजपा पक्षात प्रवेश करत आहे. आज राष्ट्रवादीचे माजी गृहराज्य मंत्री तथा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिरे यांनी आज १२ वाजता मातोश्री येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आता राष्ट्रवादीतून अजून एका बड्या नेत्याचे नाव समोर येत आहे.

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या मधुकर पिचड यांचाच आमदार मुलगा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

वैभव पिचड हे लवकरच भाजपात दाखल होणार असल्याची माहिती भाजपातील सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेले आणि मंत्री बनलेले राधाकृष्ण विखे यांच्यासोबत वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Leave a comment

0.0/5