काँग्रेस नेते हेमंत देशमुख यांच्या अडचणीत वाढ….

काँग्रेस | Congress leader Hemant Deshmukh's problems increase ...

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण घरकुल घोट्याळ्याप्रकरणी तुरुंगात असतानाच देशमुख यांच्यावर आणखी एका भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत देशमुख यांच्यावर द्वारकाधीश उपसा जलसिंचन योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता.

त्यानंतर आता ACB ने केलेल्या चौकशीत देशमुख यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचं उघड झालं आहे. सहाय्यक निबंधक यांच्या आदेशानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे घरकुल घोट्याळ्यात देशमुख जामीन मिळाला तरी भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने याप्रकरणी त्यांना अटक होऊ शकते.

हेमंत देशमुख यांच्यासह जिल्हा बँकेतील तत्कालीन अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सध्या घरकुल प्रकरणात देशमुख पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्यात तुरुंगाबाहेर आल्यानंतर भ्रष्टाचार प्रकरणात देशमुख यांना अटक निश्चित आहे. दरम्यान, दोंडाईचा येथील घरकुलात गैरव्यवहार केल्याप्रकरणी हेमंत देशमुख यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने त्यांना जिल्हा न्यायालयात ताब्यात घेऊन अटक केली. डॉक्टर देशमुख अंतरिम जामीनावर होते. मात्र हा जामीन रद्द झाल्यामुळे त्यांना न्यायालयाच्या आवारातच ताब्यात घेण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here