Skip to content Skip to footer

आनंदराव अडसूळ खा. नवनीत राणांवर खटला दाखल करणार…

सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याबाबतचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी गुरूवारी केला. यामधील आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव यांचा नामोल्लेख लोकसभा सचिवालयाद्वारा सदस्यांना देण्यात आलेल्या खा. नवनीत राणा यांच्या भाषणाच्या प्रतीमधून वगळण्यात आला आहे. ८०० कोटी रुपयांच्या बँकेत ९०० कोटींचा झालेला घोटाळा व सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये सुनील भालेराव या नावाचा व्यक्ती खातेदार, शेअर होल्डर कर्जदार नसताना ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खोटी माहिती लोकसभा सभागृहासमोर ठेवून संपूर्ण देशवासीयांची दिशाभूल करण्यात आली. खा. राणा यांनी केलेल्या बदनामीबाबत स्वतंत्र खटला दाखल करणार असल्याची माहिती अडसूळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मुंबई येथील सिटी बँकेत ९०० कोटींच्या घोटाळ्यात ९१ हजार खातेदारांची आनंदराव अडसूळ व त्यांचे स्वीय सहायक सुनील भालेराव यांनी फसवणूक केली. याप्रकरणी या दोघांचेही बँक खाते सील करावे, घोटाळ्याची चौकशी व कारवाईची मागणी खासदार नवनीत राणा यांनी गुरुवारी केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे लोकसभेतील चर्चेदरम्यान केली.

सुनील भालेराव या नावाचा व्यक्ती खातेदार शेअर होल्डर कर्जदार नसताना ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची धादाआंत खोटी माहिती लोकसभा सभागृह समोर ठेवून संपूर्ण देशवासीयांची दिशाभूल करण्यात आली आहे..

Leave a comment

0.0/5