Skip to content Skip to footer

तुम्ही बाळासाहेबांना दिलेला त्रास जनता विसरली नाही, भुजबळ विरोधात सेना कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिरे यांनी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्तिथीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यांच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि कधीकाळी शिवसैनिक असलेले छगन भुजबळ हे सुद्धा शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे अशा बातम्या वृत्त वाहिनीवर चालवल्या जात होत्या. यावर कडवट शिवसैनिकांनी बॅनरबाजी करून भुजबळांना टोला लगावला आहे.

 

शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या विरोधात बॅनर लावत त्यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. या बॅनरवर छगन भुजबळ यांचा लखोबा लोखंडे असा उल्लेख करण्यात आला असून ‘भुजबळ यांनी आहेत तिथेच रहावं तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना दिलेला त्रास जनता आणि शिवसैनिक विसरलेली नाही’ असेही बॅनरवर नमूद करण्यात आले आहे.

‘केसात गजरा आणि गावभर नजरा’ अशा “काहीतरी नावाचे पूर्वी तमाशात वग नाट्य व्हायचे त्यातले प्रमुख पात्र लखोबा लोखंडे यांच्याशी मिळते जुळते वाटते! उगवला दिवस की मी परत येतो… साहेबांना दिलेला त्रास महाराष्ट्रातील जनता विसरु शकत नाही आपण आहे तिथेच रहा “असा मजकूर लिहून रविंद्र तिवारी या शिवसैनिकाने छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Leave a comment

0.0/5