Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीचे मनोहर नाईक यांचे चिरंजीव शिवसेनेच्या वाटेवर ?

लोकसभेच्या दारूण पराभवानंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तसेच आघाडीतून मोठ्या प्रमाणात आउटगोइंग सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर तसेच माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे देखील हाती बांधणार शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांनी देखील काही दिवसांपूर्वी धनुष्यबाण हाती घेतले आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला चांगलाच झटका बसला आहे. आता इंद्रनील नाईक हे सुद्धा शिवसेनेच्या वाटेवर आहेत. इंद्रनील नाईक यांच्या शिवसेना प्रवेशाने पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5