Skip to content Skip to footer

आता ठाकरे चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट २५ जानेवारी २०१९ ला रोजी प्रदर्शित झाला होता. याला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. आणि आता ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ठाकरे या चित्रपटात शिवसेना स्थापनेपासून ते राज्यात युतीची सत्ता येण्यापर्यंतच्या प्रमुख घटना दाखवण्यात आल्या आहेत. यानंतर आता सिक्वलमध्ये राजकारणात झालेला उदय, त्यानंतर झालेली पक्षातील बंड यासह अनेक प्रमुख घटना प्रेक्षकांसमोर आणली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत हे ‘ठाकरे’ चित्रपटाचा सिक्वल तयार करणार आहेत. यासाठी दिगदर्शनाची धुरा मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि बॉलिवूडमध्ये वावर असलेल्या दिग्ददर्शकाकडे देण्यात येणार आहे.

Leave a comment

0.0/5