Skip to content Skip to footer

राष्ट्रवादीला आता पर्यंत २० नेत्यांचा राम-राम, आणखी बाहेर पडण्याच्या मार्गावर ?

लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षातील अनेक मतबल नेत्यांनी राष्ट्रवादीला राम-राम करत सेना-भाजपा पक्षाचा सहारा आपल्या राजकीय भवितव्यासाठी घेतलेला आहे. दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिरे यांनी हातात शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आता त्याच पाठोपाठ महिला अध्यक्ष चित्रा वाघ ह्या सुद्धा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा देत भाजापा पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहे.

आज तागायत पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीतील २० नेत्यांनी पक्षांतर केले. यामध्ये बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, राहूल कूल, किसन कथोरे, कपिल पाटील, सचिन अहिर, लक्ष्मन ढोबळे, निवेदिता माने, विनय कोरे, संजय सावकारे, प्रसाद लाड, लक्ष्मण जगताप, बाबासाहेब देशमुख, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, सुरेश धस, विजयकुमार गावीत, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील, पांडुरंग बरोरा या नेत्यांचा समावेश आहे.

दरम्यान राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारी असलेल्या नेत्यांची यादी देखील मोठी झाली आहे. यामध्ये संग्राम जगताप, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, बबन शिंदे, संदीप नाईक, दिलीप सोपल, चित्रा वाघ, आणि शिवेंद्रराजे भोसले हे नेते देखील राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

Leave a comment

0.0/5