Skip to content Skip to footer

13 ऑगस्टला राज्यात अजून एक राजकीय बॉम्बस्फोट होणार – चंद्रकांत पाटील

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. तर विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजूट करायची सोडून सत्ताधारी भाजपात प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजून एक गौप्यस्फोट केला आहे.

कोल्हापूर येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले की, येत्या १३ ऑगस्टला मोठा बॉम्ब फुटणार आहे. कारण काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात येण्यासाठी रांग लावली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातचं मोठा बॉम्ब फुटणार आहे. तसेच कोल्हापुरातही १० दिवसांनी असा कार्यक्रम होणार आहे. १३ ऑगस्टला कोल्हापुरात मोठा बॉम्ब फुटणार आहे, असा सूचक इशारा पाटील यांनी दिला.

दरम्यान विधानसभा निवडणुकांना आता काही काळ शिल्लक राहिला आहे. मात्र त्या पूर्वीच काँग्रेस – राष्ट्रवादी पक्ष खिळखिळा झाला आहे. सत्ता असताना केलेले घोटाळे झाकण्यासाठी आणि आपल्यावर कोणत्याही चौकशीची आच येऊ नये यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.असे आरोप सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपा आणि पक्षांतर केलेल्या नेत्यांवर लगावत आहे.

Leave a comment

0.0/5