Skip to content Skip to footer

अखेर आमदार कालिदास कोळंबकर भाजपावासी होणार ..!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे आधीच काँग्रेसला फटका बसत असचाना त्यातच आता वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोळंबकरांनी आपला राजीनामा दिला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती असून त्यानंतर ते ३१ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान कोळंबकर हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. गेल्या साडेचार वर्षात काँग्रेस पक्षाने माझ्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यात न्याय दिला नाही. त्यामुळेच मी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं कालिदास कोळंबकरांनी यांनी म्हटलं आहे. तसेच माझी कामं मुख्यमंत्र्यानी केली आहेत, त्यामुळे मी त्यांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी यापूर्वी म्हटले होते.

Leave a comment

0.0/5