Skip to content Skip to footer

आता हिशेब होणार, तुमीच महाराष्ट्र लुटलाय – चंद्रकांत पाटील

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ नेते मंडळी आपल्या पक्षाला राम-राम करत शिवसेना भाजप पक्षात सामील होत आहे. आधीच लोकसभा निवडणुकीला झलेला पराभव, पक्षाची ढासळत चाललेली परिस्थिती आता त्यातच पक्षातील बड्या नेत्यांची चालू झालेली आउटगोइंग त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीला सुद्धा पराभव पत्करावा लागणार असेच चित्र निर्माण होत आहे.

यावर पत्रकार परिषद आयोजित करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपा पक्षावर जोरदार टीका केली होती. या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सुद्धा जोरदार उत्तर पवारांना दिले आहे.पाटील म्हणाले की, येणारं सरकार मजबूत असेल, आता सगळा हिशेब करणार, तुम्हीच महाराष्ट्र लुटलाय. कुणाकुणाला इन्कम टॅक्सची भीती दाखवली ते सांगा? तुम्हाला आपली माणसं जपता आली नाहीत, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर केली.

तुम्हाला तुमची माणसं जपता येत नाहीत, दुसऱ्यालाच दोष देता. भाजप कुणालाही ईडी, इन्कम टॅक्सची भीती दाखवत नाही. इन्कम टॅक्सची धाड १५ दिवसांत प्लॅन होत नाही. देशात अशा काही संस्था आहेत ज्यावर कुणाचाही अधिकार नसतो. शरद पवार अशी विधान सहानुभूती निर्माण होण्यासाठी करत आहेत. गेल्या ७० वर्षे त्यांनी देश लुटलाय, असं वक्तव्यही चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात केले..

Leave a comment

0.0/5