Skip to content Skip to footer

आमचं खत चांगलंय, महाराष्ट्र हिरवागार अन भगवा होणार – आदित्य ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्र्वादीदी आणि काँग्रेस पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून भाजपा-सेना पक्षात प्रवेश करत आहे यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली होती. आमचे खत चांगले आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार, अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टोला शरद पवारांना टोला लगावला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी अंधेरी मरोळ येथील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य यांनी हे वक्तव्य केले.

 

आदित्य ठाकरे यांच्यासह अकराशे नागरिकांनी एकाच वेळी अकराशे रोपे लावली. या वेळी बोलताना आदित्य म्हणाले, आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगले आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे, असेही आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखविले होते.

Leave a comment

0.0/5