Skip to content Skip to footer

खा. नवनीत राणा कौर यांच्या अडचणीत वाढ

खासदार नवनीत राणा यांच्या विजयाला आवाहन देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात पिटिशनद्वारे माजी खासदार आनंदराव अडसूळ व सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररीत्या दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या याचिकेद्वारे आज खा. नवनीत राणा यांना स्वतः कोर्टात हजर राहून आपले म्हणणे मांडण्या करिता आदेश कोर्टातर्फे देण्यात आलेला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय व्यक्ती करीता राखीव असतांना याचिका कर्त्यांच्या मते अपात्र असलेल्या “लुभाणा” जातीच्या नवनीत राणा यांनी निवडणूक लढून मागासवर्गीयांचे संविधानिक अधिकार हिरावून घेतलेला आहे.

नवनीत राणा यांच्या वडिलांचे मोची जातीचे जात प्रमाणपत्र मुंबई जातपडताळणी समितीच्या निर्णयामुळे रद्द करून जप्त कऱण्यात आले असतांना मूळ पंजाब येथील “लूभाणा” जातीच्या व्यक्तीकडून महराष्ट्रात अमरावतीत मागासवर्गीयासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडणूक लढून खऱ्या पात्र मागासवर्गीय व्यक्तीवर खा. राणा यांनी अन्याय केला आहे यासाठी सर्व सरकारी पुराव्यासह आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या गैर प्रक्रिये विरुद्ध ह्या दोन्ही याचिकेत आरोप करण्यात आले आहेत. नवनित राणा यांनी नोकरीच्या संदर्भात काढलेले मोची जातीचे प्रमाणपत्र लोकसभा निवडणूक अर्जा सोबत जोडून निवडणूक लढवली होती.

Leave a comment

0.0/5