Skip to content Skip to footer

माजी खा. धनंजय महाडिक भाजपाच्या वाटेवर ..?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. अस असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसला अजून एक धक्का बसला आहे. कोल्हापूरचे माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय महाडिक हेही आता भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील माजी मंत्री भरमू पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ‘दर दहा दिवसाला प्रवेशाचे कार्यक्रम होत राहतील अस विधान करताना आगामी प्रवेशाचा कार्यक्रम येत्या १३ ऑगस्टला होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महाडिक आणि पाटील यांच्यातील जवळचे असलेले संबंध याला कारणीभूत आहे असेच बोलले जाते.

भाजपा मध्ये प्रवेश केलेले भरमू पाटील हे महाडिक गटाचेच आहेत. त्यामुळे ते भाजपा पक्षात प्रवेश करु शकतात. येत्या २८ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत माजी खासदार महाडिक भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजूनच कमकुवत होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे

Leave a comment

0.0/5