Skip to content Skip to footer

१५ वर्ष राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता येणार नाही – चंद्रकांत पाटील

महसूल मंत्री तथा पुणे जिल्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे. युती सरकारने गेल्या पाच वर्षात राज्यात केलेल्या विविध विकासकामांमुळे जनतेमध्ये भाजपाविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे.

त्यामुळेच अन्य पक्षांतील नेते व कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत, असे वक्तव्य चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित महाजनादेश यात्रेच्या बोधचिन्हाचे अनावरण चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले. त्यावेळी चंद्रकांतदादा पाटील बोलत होते.

आगामी पंधरा वर्षे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार नाही. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी नेत्यांना भाजपासोबत यावेसे वाटते. भाजपामध्ये घाणेरडे राजकारण होत नाही, याची अन्य पक्षातील नेत्यांना जाणीव झाली आहे. त्यांनी सांगितले की, माजी केंद्रीय मंत्री व माजी राज्यपाल राम नाईक पुन्हा राजकारणात सक्रीय होत असून मंगळवारी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

Leave a comment

0.0/5