Skip to content Skip to footer

जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्याला बुधवार पासून प्रारंभ

शिवसेना नेते व युवासेना प्रमुख मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा दिनांक ३१ जुलै २०१९ ते ४ ऑगस्ट २०१९ रोजी आयोजित केला आहे. जळगाव ते नाशिकच्या पहिल्या टप्प्यात जनतेने दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

दुसऱ्या टप्प्यात सोलापूर व मराठवाडा येथील, दि. ३१ जुलै २०१९ रोजी सोलापूर व धाराशिव, १ आणि २ ऑगस्ट रोजी लातूर, नांदेड व परभणी, दि. ३ ऑगस्ट रोजी परभणीचा काही भाग व हिंगोली व दि. ४ ऑगस्ट रोजी बीड जिल्ह्यातील विभागांना भेट देऊन आदित्यसाहेब ठाकरे जनतेचे आशीर्वाद घेणार आहेत.

नव महाराष्ट्र घडवण्यासाठी, मतदार राजांनी लोकसभा निवडणूकीत युतीला केलेल्या मतदानाबद्दल आभार मानण्यासाठी व ज्या मतदारांनी मतदान केले नाही त्यांची मने जिंकण्यासाठी ही यात्रा असणार आहे.
सदर यात्रेचे स्वरूप खालीलप्रमाणे असणार आहे.
१) विजय संकल्प मेळावा.
२) गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकसभा.
३) शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ‘आदित्य संवाद’ चे आयोजन.
४) शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जनआशीर्वाद यात्रेचे स्वागत.

Leave a comment

0.0/5