Skip to content Skip to footer

स्थानिक उमेदवार असताना रोहित पवार का ? कार्यकर्त्यांचा सवाल

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. एकीकडे सेना -भाजपा पक्षाची युती जाहीर झालेली असताना दुसरीकडे राष्ट्र्वादीने काँग्रेसचा विचार न करता सर्वच्या सर्व जागेवर इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहे.

त्यातच रोहित पवारने सुद्धा आपण कर्जत-जामखेड या मतदार संघातून निवडणुकीला उरणार असल्याचे जाहीर केले आहे. तसे त्यांनी या विषयीची कल्पना राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा आपल्या आजोबांना सुद्धा दिलेली आहे. परंतु आता रोहित पवारांची उमेदवारी धोक्यात येत असताना दिसत आहे.

रोहित पवारांनी मागणी केलेला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याचा असून काँग्रेसने ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यातच नगरमध्ये काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या त्यात माजी सभापती मीनाक्षी साळुंखे यांनी उमेदवारी मागितली आहे.

तसेच स्थानिक उमेदवार असताना आयात उमेदवारांना संधी देऊ नका अस स्थानिकां म्हणणे आहे. कारण स्थानिक उमेदवार सक्षम असताना बाहेरचे उमेदवार लादण्यात येऊ नये असं मतही स्थानिकांनी व्यक्त केलंय. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर कसा तोडगा काढतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a comment

0.0/5