Skip to content Skip to footer

तिहेरी तलाक नंतर, भविष्यात कलम ३७० आणि ३५ अ काढणारं – संजय राऊत

देशात महत्वपूर्ण मानले नजणारे तिहेरी तलाक विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा सुरु आहे. त्यामुळे लोकसभेत तीन वेळा मंजूर झालेले विधेयक देशाच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत टिकणार का ? याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. तर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी विधेयकाच्या समर्थनार्थ सभागृहात भाषण केले आहे. तिहेरी तलाक विधेयक ही तर सुरुवात आहे. यापुढे हे सरकार अनेक जुलमी कायदे हटवणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

यावेळी राऊत म्हणाले की, हे सरकार मुल्लांचा कायदा बाजूला काढून संपूर्ण देशाला संविधानाच्या कायद्यात आणत आहे. तिहेरी तलाक प्रतिबंध कायदा ही तर सुरवात आहे. समान नागरी कायद्याच्या दृष्टीने हे पाहिले पाऊल आहे. भविष्यात कलम ३७० आणि ३५ अ हे कायदे देखील काढले जाणार आहेत. त्यामुळे मी तिहेरी तलाक प्रतिबंध कायद्याच्या समर्थनात आहे.

Leave a comment

0.0/5