मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांचे आज स्वागत केले. कैदास कोळंबकर , छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ, संदीप नाईक, मधुकर पिचड, वैभव पिचड यांचे आज मुख्यमंत्र्यांनी भाजपात स्वागत केला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्या नेत्यांवर स्तुतिसुमनही उधळली आहेत. मधुकर पिचड यांच्या पक्षप्रवेशावर मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आदर व्यक्त होतो, असे पिचड साहेब आहेत. मधुकर पिचड यांचा हा भाजपा प्रवेश अत्यंत महत्त्वाची घटना आहे.
शिवेंद्र राजेंच्या भाजपा प्रवेशामुळे अनेकांना धक्का बसला असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ते म्हणाले, शाहू महाराज घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी राजे आधीच भाजपामध्ये आहेत. आणि आज प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शिवेंद्र राजे भाजपामध्ये दाखल झाले आहेत. मोदींनी राजगडावर जाऊन छत्रपतींचा आशीर्वाद घेतला होता, त्यानंतर ते पंतप्रधान झाले आहेत, याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्तानं करून दिली आहे.
1 Comment
विजय दामोदर धर्माळे. रा.बोरगांव धर्माळे ता.जि.अमरावती
जिदर बम ,उदर हम.गोरे गेले….. काळे आले. समोसा तोच ,मसाला एक। कचोरी तीच,मसाला एक. फरक काहीच नाही जनता लोकशाही मार्गाने चललीआहे. पैशाने लोकशाही चालवली जाते.विचराणे नाही. कुटुंबातील लोकांना रोजगार नाही. दुसऱ्या कुटुंबात रोजगार मीळतो म्हणून आम्ही प्रवेश करतो. जय जवान+ जय किसान×जय विज्ञान=जय भारत माता .तरी माझ्या देशात आम्ही महान.