Skip to content Skip to footer

पवारांनी शिवसेनेच्या नेत्यांना फोडले तेव्हा कोणती चौकशी लावली होती-चंद्रकांत पाटील

आज मुंबईत कालिदास कोळंबकर, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ तसेच मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात जाहीर प्रावेश केला. या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. पवारांनी भुजबळांना, नाईकांना शिवसेनेतून फोडलं तेव्हा कोणती चौकशी लावली होती? असा थेट सवाल चंद्रकांतदादांनी पवारांना विचारला आहे.

पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ज्यांना स्वत:चं भविष्य दिसत असेल ते नेते पक्षप्रवेश करत आहेत. मंत्रीमंडळात एकूण मंत्र्यांपैकी १३ शिवसेनेचे सोडले तर उर्वरित २९ मंत्री ज्यांनी भाजपा उभारण्यासाठी मदत केली. ज्यांनी पक्ष वाढविण्यासाठी कष्ट घेतले अशांकडे मंत्रीपदे आहेत. त्यामुळे पक्षात जे प्रवेश करतील त्यांचा फायदा होईल तोटा होणार नाही अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

तसेच पुढच्या आठवड्यात आणखी पक्ष प्रवेश होणार आहेत. प्रवेश करणाऱ्या नावांची छाननी करून निवड करावी लागते. कोणत्याही कार्यकर्त्यांची नाराजी असण्याचे कारण नाही. त्यांची समजूत काढण्यात येईल. इथे असणाऱ्या कार्यकर्त्यावर कधी अन्याय झाला नाही असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले.

Leave a comment

0.0/5