Skip to content Skip to footer

शरद पवार हृदयात आहेत असे म्हणणाऱ्याचे हृदय तपासा – शरद पवार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्र्वादीतील अनके डिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीला राम-राम करत भाजपा आणि सेना पक्षात प्रवेश केला आहे. प्रथम बीड जिल्याचे वजनदार नेते जयदत्त (अण्णा ) क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला, त्या पाठोपाठ सचिन अहिरे, शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड, वैभव पिचड आणि चित्रा वाघ यांनी सुद्धा भाजपात प्रवेश करत राष्ट्रवादीला धक्काच दिला या प्रवेशनानंतर संदर्भात साताऱ्यात पत्रकार परिषदेत भाष्य करताना सूचक विधान अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

“शरद पवार हृदयात आहेत बोलणाऱ्यांचे हृदय तपासा”,असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. तसेच अजून कोणी जाणार असेल तर त्यांनाही शुभेच्छा असेही यावेळी त्यांनी म्हणून दाखविले. साताऱ्यासाठी माझ्याकडे तीन अर्ज आहेत. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी राखेल याची काही चिंता नाही असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांनी शिवेंद्रराजे यांच्या भाजपा प्रवेशावरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “शिवेंद्रराजे मला भेटले तेव्हा पक्ष सोडणार नाही असे सांगितल होते. शिवेंद्रराजे यांनी मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगितलं आहे असे सुद्धा पवारांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5