Skip to content Skip to footer

शिवेंद्रराजेंच्या प्रवेशानंतर तडफदारीने शरद पवार साताऱ्यात दाखल…..

सातारा जावळीचे आमदार व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे व पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश शरद पवारांच्या जास्तच जिव्हाळी लागलेला दिसून येत आहे. मुंबईत घडलेल्या प्रवेशानंतर रात्रीच शरद पवार सातार्‍यात दाखल झाले होते. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेटवर्क व कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहे त्यामुळे ते काळजी घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला भगदाड पडल्यानंतर शरद पवारांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून ते सातार्‍यात आले आहेत.

बुधवारी रात्री उशीरा शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी उपस्थित होते. पवारांनी बंद खोलीत या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. सातारा, जावलीतील घडामोडींबाबत त्यांनी विशेष माहिती घेतली. पवारांनी तालुकानिहाय संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगानेही आढावा घेतला.

बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची प्रचंड पडझड झाली. या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार बुधवारी रात्रीच सातार्‍यात दाखल झाले असून पडझडीनंतरच्या घडामोडींचा ते स्वत: आढावा घेत आहेत.शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशावर काय भाष्य करणार व जिल्ह्यातील पक्षाची आगामी रणनिती काय असणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a comment

0.0/5