Skip to content Skip to footer

भाजपाची दुसरी मेगा भरती, ५० आमदारांच्या प्रवेशाची तारीख ठरली

निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने मेगाभरती सुरु केली आहे. काल ३१ जुलैला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांनी प्रवेश केल्यानंतर येत्या १० ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने भाजपा मध्ये दुसरी मेगाभरती होणार आहे. या मेगाभरती दरम्यान एक-दोन नव्हे तर जवळपास ५० आमदारांचे प्रवेश भाजपमध्ये होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीला राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे उमेदवार सुद्धा शिल्लक राहत नाही अशीच काहीशी परिस्थिती झालेली दिऊन येत आहे.

भाजपने आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. या महाजनादेश यात्रेत विविध पक्षातील आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ही यात्रा जसजशी जिल्ह्या-जिल्ह्यात फिरेल, तसतसे त्या त्या जिल्ह्यातील आमदार भाजपा मध्ये प्रवेश करतील असे सांगण्यात येत आहे.

मात्र स्थानिक पातळीवर गटबाजी उफाळून येण्याच्या भीतीने भाजपने ही मेगाभरती १० ऑगस्टपर्यंत टप्प्या-टप्प्याने निश्चित केल्याचीही माहिती मिळत आहे. तब्बल ५० आमदार भाजपा मध्ये येणार असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची धाकधूक नक्कीच वाढली आहे.

Leave a comment

0.0/5