Skip to content Skip to footer

भविष्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकून राहणार का ?

काँग्रेस पासून विभक्त होत शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली होती. या स्थापनेनंतर खुद्द शरद पवारांनी राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु करत काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील अनेक नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले होते. आज राष्ट्रवादीत असलेले अनेक वरिष्ठ नेते शिवसेना आणि काँग्रेसच्या तालमीत तयार झालेले मुसद्दी राजकारणी नेते मंडळी आहेत. आज मराठीत एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे “जसे पेरले तसेच उगवले” अशीच काहीशी प्रचीति सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांना येत आहे.

२०१४ च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्षाला जशी उतरती कळाच लागलेली दिसून येत आहे. ते आज तागायत राष्ट्र्वादीतील अनके बडे नेते राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत भाजपा आणि शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे. खुद्द साताऱ्याचे राजे शिवेंद्रराजे भोसले यांनी सुद्धा राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश केला आहे. त्या पाठोपाठ सचिन अहिरे, मधुकर पिचड, चित्रा वाघ, जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाला राम-राम करत सेना-भाजपा पक्षात प्रवेश केला आहे. या निर्णयनानंतर सातारा सुद्धा आपल्या हातून जाणार या भीतीने पवारांनी रात्रीच्या रात्री सातारा गाठले होते.

आज या वयात सुद्धा पवारांना पक्ष बांधणीसाठी राज्याचा दौरा करावा लागत असेल तर हे राष्ट्रवादीसाठी मोठे दुर्दैव्य आहे. आज हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नेते मंडळी राष्ट्रवादी मध्ये राहिलेली आहे. त्यातच अजून एक मेगा भरती भाजपात होणार आहे असे बोलून भाजपाने तर पवारांना घामच सोडलेला आहे.

आज ज्या मेहनतीने इतर पक्ष फोडून पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली आज त्याच वेगाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी संपुष्ठात येण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. मह्णूच येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकून राहणार का? असाच प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

Leave a comment

0.0/5