Skip to content Skip to footer

अखेर आ.शिवेद्रराजेनी सांगितले राष्ट्रवादी सोडण्यामागचे कारण

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा हा बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मात्र शिवेंद्रसिंहराजे यांच्या पक्षांतरावरून सातारच्या राजकारणात आरोप – प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आज शिवेंद्रसिंहराजे यांनी पक्षांतराचे कारण सांगितले आहे. ते सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले की, माझ्या मतदार संघातील कुरघुड्यांबद्दल खासदार उदयनराजे भोसलेंना समोर घेऊन वाद मिटवतो, असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील भेटीत दिले होते. परंतु पवारांनी सांगूनही ह्या कुरघुड्या थांबणाऱ्या नव्हत्या, त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. तसेच माझ्याचं पक्षातील कुरघुड्यांमुळे दगाफटका होत असेल, तर मला कोणताही पक्ष विचारणार नाही. शिवाय माझे कार्येकर्तेही मला विचारणार नाहीत, म्हणून मी राष्ट्रवादी सोडली असे स्पष्टीकरण शिवेंद्रराजेंनी दिले आहे.

दरम्यान सत्तेशिवाय राहता येत नाही, म्हणून शिवेंद्रसह इतर आमदार हे भाजपमध्ये गेले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिले होते. त्यावरून शिवेंद्रराजे यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच मतदारसंघातील कामं न झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे, असे शिवेंद्रराजे राजीनामा दिल्यानंतर म्हणाले होते.

Leave a comment

0.0/5