Skip to content Skip to footer

ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्टला मुंबईत महा मोर्चा…

महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेत ईव्हीएमविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. मुंबईमध्ये २१ ऑगस्टला सर्व विरोधी पक्ष ईव्हीएमच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरणार आहेत. ‘आमच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी ईव्हीएम चीप अमेरिकेत का तयार करण्यात यावी, ज्या अमिरेकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. मी ममता बॅनर्जींनाही भेटलो. याबद्दल देशातील प्रत्येक राज्यात उठाव होईल,’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

‘ईव्हीएममध्ये शंकेस वाव आहे. स्वत:च्याच कुटुंबातील लोकांची जितकी मते आहेत तेवढीही त्या उमेदवार न मिळाल्याचीही काही प्रकरणं समोर आली आहेत. जनतेला ज्यांना बहुमत द्यायचे आहे ते देतील. पण ईव्हीएमबाबत संभ्रमावस्था असल्याने आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपर घ्या अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे येन निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात ईव्हीएम वरून मोठे रान उठणार आहे असेच चित्र निर्माण होणार आहे.

Leave a comment

0.0/5