Skip to content Skip to footer

आम्ही भाजपाची ” बी ” टीम कसे आधी स्पष्टीकरण द्या मगच आघाडीचे बोला

विधानसभा निवडणुकीला काँग्रेस वंचित बरोबर आघाडी करायला उस्सुक असताना पुन्हा एकदा वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस मधील अनेक बड्या नेत्यांनी आपल्या पराभवाचे खापर वंचितवर फोडून रिकामे झाले होते. आता पुन्हा एकदा येणाऱ्या निवडणुकीला दलित आणि मुस्लीम मतांचे विभाजन रोखण्यासाठी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा आंबेडरांबरोबर चर्च करण्याचे ठरविले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. याबाबत काँग्रेसने खुलासा करावा. त्यानंतर आम्ही काँग्रेससोबत चर्चा करू, असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी ऑगस्ट महिन्यात आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. अस प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे

Leave a comment

0.0/5