Skip to content Skip to footer

“देश वाचवायला की पक्ष वाचवायला” ईव्हीएम मशीनला विरोध

सध्या देशात आणि संपूर्ण महाराष्ट्रात ईव्हीएम विरोधात विरोधी पक्षाचे नेते एकत्र आलेले आहे. या संदर्भात आज बांद्रा येथे झालेल्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि भुजबळ आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी, जयंत पाटील, शिक्षक आमदार कपिल पाटिल आदी उपस्थित होते. आज देशात ईव्हीएम १९८२ पासून वापरण्यात येत आहे. केरळमधील परुर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी ५० मतदान केंद्रांवर प्रथमच ईव्हीएम वापरण्यात आले होते तेव्हा सत्तेत असलेल्या काँग्रेसने या मशीनला विरोध का? केला नाही असाच सवाल आज उपस्थित होत आहे.

 

 

ईव्हीएम | The defeat of the Legislative Assembly will again hit the EVM

भारता बरोबर ब्राजील, फिलीपींस, बेल्जियम, एस्टोनिया, संयुक्त अरब अमीरात, वेनेजुएला, जॉर्डन, मालदीव, नामीबिया या सारख्या देशात सुद्धा ईव्हीएम वापरले जात आहे. परंतु या देशात आता पर्यंत असा कोणताही उठाव मशीन विरोधात झालेला दिऊन आलेला नाही आहे. परंतु देशातील आणि राज्यातील काही पक्ष निवडणुकीत झालेला आपला पराभव कुठेतरी लपवण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी मशीनवर खापर फोडत आहे.

आज काँग्रेसने देशात जनतेच्या हिताची कामे आणि निर्णय घेतले असते तर या जनतेने पुन्हा २०१९ च्या निवडणुकीला ह्यांना निवडणून दिले असते. मागील ४ वर्षाच्या कालखण्डात काँग्रेसचे आणि इतर विरोधी पक्षाचे बाहेर पडत असलेल्या घोटाळ्यामुळे ह्यांनी फक्त मागील १५ वर्षपासून जनतेला लुबाडायचे काम केले आहे हे सिद्ध होते. म्हणूनच १०१९ च्या निवडणुकीला जनतेने यांना पुन्हा सत्तेत येऊ दिले नव्हते. आता विधानसभेत होणारा आपला पराभव झाकण्यासाठी पुन्हा ईव्हीएम मशीनला विरोधकांकडून टार्गेट केले जात आहे.

Leave a comment

0.0/5