Skip to content Skip to footer

“पवारांनी जे पेरल तेच उगवल” – माजी मुख्यमंत्री निलंगेकर

पवार स्वतः फोडाफोडी करून मुख्यमंत्री झाले.सत्तेसाठी ज्यांनी ४ वेळा पक्षांतर केले आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना सोडले. शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं आहे. त्यांना पक्षांतरावर बोलण्याचा अधिकार नाही आहे. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवाजी पाटील-निलंगेकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. निलंगेकर एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांना त्यावेळी घडलेल्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. शरद पवारांनीच त्यावेळी काँग्रेस फोडली असा आरोप सुद्धा त्यांनी लावला.

पवारांनीच त्यावेळी काँग्रेसचे नुकसान केले. फोडफोडीचे राजकारण करून काँग्रेसच्या नेत्यांना फोडून आपल्याबरोबर घेतले आणि तेव्हाच पवारांनी फोडलेल्या नेत्याच्या जिवावर राष्ट्रवादीची स्थापन केली. यात काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. पवार फोडाफोडी करून त्यावेळी मुख्यमंत्री झाले याची आठवण सुद्धा निलंगेकर यांनी करून दिली.

स्वतः पवारांनी एकदा नाही तर चार वेळा पक्ष सोडल्यानंतर त्यांनी काँग्रेस मध्ये फूट पाडली आणि दुसरी काँग्रेस स्थापन केली तसेच पुलोदचा प्रयोग केला अशा पवारांना पक्षांतरावर बोलायचा काय अधिकार? असा सवालच शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

Leave a comment

0.0/5