Skip to content Skip to footer

विधानसभेच्या पराभवाचे खापर पुन्हा ईव्हीएमवर फोडणार

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अनके डिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिट्टी देत सेना-भाजपा पक्षात प्रवेश केलेला आहे. आज काही महिन्यावर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला उभे राहण्याइतके चांगले उमेदवार सुद्धा आज या दोन्ही पक्षाकडे राहिलेले नाही आहे. त्यामुळे या पक्षांना येणाऱ्या निवडणुकीला आपला पराभव दिसू लागल्यामुळे यांनी येणाऱ्या निवडणुकीचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडण्याचा बेतचं आखलेला आहे.
आता या दोन्ही पक्षाच्या जोडीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा मशीन विरोधात मैदानात उतरले आहे.

 

ईव्हीएमवर शंका सोडा, जनतेमध्ये जा – देवेंद्र फडणवीस

काही दिवसापूर्वी या संदर्भात दिल्ली येथे निवडणुक आयोगाची भेट सुद्धा राज ठाकरे यांनी घेतलेली होती. तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांची सुद्धा भेट घेतली होती आज आपल्या पक्षाचे उमेदवार न उभे करता फक्त कोणाच्या सांगण्या वरून राज ठाकरे आज ईव्हीएमला विरोध करताना दिसत आहे.

आज एकमेकांना शिव्या घालणारे, भर सभेत टीका करणारे आज नेते एकच व्यासपीठावर आलेले दिसून येत आहे. आज राज्यात इतकी वर्ष सत्ता भोगून जनतेचे भले न करणारी या काँग्रेस-राष्ट्र्वादी पक्षाला जनतेने घरचा रस्ता दाखविला होता. आणि आता पुन्हा एकदा तिच परिस्थिती येणाऱ्या निवडणुकीला या दोन्ही पक्षाची आणि नव्याने मित्र झालेल्या मनसे पक्षाची होताना दिसून येणार आहे. म्हणूनच आपला पराभव पचवण्यासाठी कुठेतरी विरोधकांनी ईव्हीएमवर खापर फोडले आहे.

Leave a comment

0.0/5