हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असूनही शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. कळमनुरी,वसमत हिंगोली याठिकाणी शिवसैनिक यात्रेची तयारी पूर्ण करत आहेत. शनिवारी सकाळपासून पाऊस असूनही भर पावसात मेहनत घेत शिवसैनिकांनी यात्रेची सर्व तयारी पूर्ण केली.
शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा शनिवारी जिल्ह्यामध्ये दाखल होत आहे. कळमनुरीत मुसळधार पाऊस असूनही सकाळी सात वाजल्यापासून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी तोष्णीवाल मंगल कार्यालयात जाऊन तयारी केली. बाळू पारवे, सखाराम उबाळे , शिवराज पाटील, राम कदम, बबलू पत्की, प्रकाश घुगे, सुहास पाटील, बाळू पाटील , आर. आर. पाटील या सर्वांनी जोमाने काम केले. कितीही पाऊस झाला तरीही कळमनुरी येथील विजय संकल्प मेळावा यशस्वी होईल असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.