Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांसमोरच भाजपा आणि काँग्रेस कार्यक्रर्ते भिडले……

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश रॅलीमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजपची महाजनादेश यात्रा सुरू असताना टेलिफोन एक्सचेंज चौकात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकवले. यामुळे चिडलेले भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते हाणामारीवर उतरत एकमेकांना भिडले.

दरम्यान, विरोधकांची जनतेशी नाळ तुटल्यामुळे त्यांना ईव्हीएमसारख्या मुद्यांचा आधार घ्यावा लागतोय, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. महाजनादेश यात्रेदरम्यान नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. विरोधक भरकटल्याची टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली

Leave a comment

0.0/5